घाटंजी : (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (बु.) परिसरात दुचाकी चोर मोटार सायकलने संशयास्पद फिरत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा व घाटंजी पोलीसांना मिळाली होती.
त्यावरुन संशयास्पद फिरणाऱ्या नितीन लोंडे (वय ३३), आकाश सोनटक्के (२२) दोघेही रा. पांढुर्णा (बु.) यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन ८ दुचाकी चोरल्याची कबुली घाटंजी पोलीसांना दिली.
आरोपी जवळून एकुण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राहुल खंडागळे पुढील तपास करीत आहे.