तलवारीसह दहशत माजवणा-यास अटक

जळगाव : लहान मुलाला पळवल्याच्या संशयातून हातात तलवार घेत वाल्मिक नगर परिसरात दहशत माजवणा-यास शनीपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. प्रविण कोळी असे पिंजारीवाडा वाल्मिक नगर परिसरातील रहिवासी व अटकेतील तरुणा चे नाव आहे. त्याला त्याच्या ताब्यातील तलवारीसह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

लहान मुलाला पळवल्याच्या संशयातून प्रविण कोळी याने हातात तलवार घेत अपहरणकर्त्याच्या शोधात परिसरात दहशत निर्माण केली. हातातील तलवारीने त्याने एका धार्मिक स्थळाजवळ असलेली पाण्याची टाकी व माठ फोडला. त्यामुळे परिसरातील नागरीक काही वेळासाठी भयभीत झाले होते.

या घटनेची शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना माहिती समजताच त्यांनी आपले सहकारी गिरीष पाटील, गजानन पाटील, अनिल कांबळे आदींना घटनास्थळी कारवाईकामी रवाना केले. त्यांनी प्रविण कोळी यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here