प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपींकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त

On: March 19, 2025 7:43 PM

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तिघा मोटार सायकल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अटकेतील तिघांविरुद्ध मालेगाव येथील आझादनगर पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्यात ते फरार होते. त्यामुळे प्राणघातक हल्ल्या प्रकरणी मालेगाव शहर पोलिसांना ते हवे होते.

मुबीन शाह शकील शाह, दानिश शाह जहीर शाह (दोघे रा. मालेगांव जि. नाशिक) आणि अमीर उर्फ अमिन शाह जहुन शाह (रा. शाहु नगर जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या तिघा मोटार सायकल चोरट्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशन जळगाव, जिल्हापेठ पोलिस स्टेशन जळगाव आणि मालेगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या एका विना नंबरच्या मोटार सायकलचा गुन्हा अद्याप उघडकीस आलेला नाही.   

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, रविंद्र चौधरी, पोना प्रदिप चौधरी, पोकॉ रतन गिते, सिध्देश डापकर, जयेश हटकर आदींनी या तपास व कारवाईकामी सहभाग घेतला. पोलिस स्टेशन हद्दीत गस्तीदरम्यान प्राणघातक हल्ल्यातील तिघे संशयीत आरोपी व मोटार सायकल चोरटे पोलिस पथकाच्या तावडीत सापडले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत धनके, पोना प्रदिप चौधरी व पोकॉ रतन गिते करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment