जळगाव जिल्ह्यात प्राणघातक हल्ल्याच्या दोन घटना – एक ठार, एक जखमी

crimeduniya
murder-@crimeduniya.com

जळगाव : जळगाव जिल्ह्यात प्राणघातक हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना आज झाल्या. एका घटनेत माजी उप सरपंचाचा मृत्यु तर दुस-या घटनेत एक तृतीयपंथी जखमी झाला आहे. खूनाची घटना नशीराबाद पोलिस स्टेशन हद्दीतील भादली येथे तर प्राणघातक हल्ल्याची घटना भुसावळ येथे घडली. दोन्ही घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही घटनांमधे जुना वाद हे सामायीक कारण सांगितले जात आहे.

युवराज सोपान कोळी (35) असे मरण पावलेल्या माजी उप सरपंचाचे नाव आहे. गुरुवारी रात्री त्याचा काही जणांसोबत हॉटेलमधे वाद झाला होता. त्या वादाच्या पुढील टप्प्यात दोघा तिघांनी मिळून त्याच्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सशस्र हल्ला चढवला. या हल्ल्यात युवराज कोळी मरण पावला. त्यानंतर मारेकरी पसार होण्यात यशस्वी झाले. भरत पाटील व दोघा तिघांनी हा प्राणघातक हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. भादली परिसरातील नातेवाईकांसह परिचितांनी जीएमसी परिसरात आक्रोश केला. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.

दुस-या घटनेत भुसावळ शहरातील डीआरएम कार्यालय परिसरात सानीया किन्नर नावाच्या तृतीयपंथीवर दोघा तिघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सानिया किन्नर हा तृतीयपंथी जबर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारार्थ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here