तरुणाच्या खूनाने जळगाव शहरात खळबळ

On: May 4, 2025 9:37 AM

जळगाव : शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणाचा काही तरुणांनी पाठलाग करत धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कालिका माता परिसरातील भरीत सेंटरनजीक झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

आकाश पंडित भावसार असे खून झालेल्या अयोध्या नगरातील तरुणाचे नाव आहे. मरण पावलेल्या आकाश भावसार याच्या घरी शनिवारी रात्री काही तरुण गेले होते. आकाश घरी नसल्यामुळे त्याच्याच पत्नीच्या मोबाईलवरुन त्याला फोन लावण्यात आला आणि त्याचे लोकेशन घेण्यात आले.

आकाश कालिका माता मंदीर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वजण त्याला पकडण्यासाठी गेले. त्याठिकाणी वाद झाल्यानंतर घाबरलेला आकाश घराच्या दिशेने पळू लागला. त्याचा पाठलाग करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. आकाशचा मित्र कुणाल सोनार याने त्याला जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment