ना पंखा ना बेड, नशीबी आला जेलचा ब्रेड ; कधी होणार बेल? रियाला हवी घरची भेळ

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सुरु झालेल्या सीबीआय व इडीच्या तपासातून पुढे पुढे सरकत रिया आता एनसीबीच्या जाळ्यात येवून अडकली आहे. या माध्यमातून बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकवेळ समोर आले आहे. बॉलीवुडची एक बाजू चंदेरी तर दुसरी बाजू काळी असल्याचे या निमीत्ताने पुन्हा एकवेळ जनतेच्या समोर आली आहे.

एनसीबीने मुख्य आरोपी असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ती आता भायखळा तुरुंगाच्या कोठडीत आहे. दोन वेळा रियाचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तिचे कायदेशीर सल्लागार असलेले अ‍ॅड. सतीश मानेशिंदे आता मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अजून काही दिवस रियाला भायखळा तुरुंगात मुक्कामी राहणे आले आहे.

भायखळा तुरुंगातील चटईवर झोपण्याची वेळ सध्या रिया चक्रवर्ती हिच्यावर आली आहे. रियाला झोपण्यासाठी ना बेड आहे ना पंखा आहे. उशीविना केवळ चटईवर ती वेळ काढत आहे. साधारण कैद्यांप्रमाणे कोरोना महामारीमुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिला हळदीचे दूध दिले जात आहे. मुंबईत महिलांसाठी भायखळा हे एकमेव कारागृह आहे. दोन पोलीस कर्मचारी सलग तीन शिफ्टमध्ये रियावर पहारा ठेवून असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here