भुसावळ येथील खून प्रकरणी तिघे अटकेत

जळगाव : भुसावळ येथील खडका चौफुलीवर रविवारी रात्री तरुणांच्या टोळक्याकडून अल्तमश शेख रशीद या तरुणावर जिवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणास उपचारार्थ डॉ. मानवतकर यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले होते. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले होते.

या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यत आला होता. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बाबासाहेब ठोंबे व त्यांचे सहकारी या हल्लेखोरांच्या मागावर होते. त्या दृष्टीने शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. हल्लोखोर आरोपी वरणगाव रोडवरील सुंदर नगर परिसरातून पळून जाण्याच्या बेतात असतांना बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेत जेरबंद केले.
शेख समीर शेख युसूफ (19), शेख शाहरूख शेख युसूफ (27) व समीर शेख रहेमान शेख अशी अटकेतील तिघा आरोपींची नावे आहेत. अमीर युसूफ शेख, आदर्श गायकवाड हे उर्वरीत आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरु आहे.

पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला, पोलिस नाईक रवींद्र बि-हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, किशोर महाजन, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, श्रीकृष्ण देशमुख, गजानन वाघ आदींच्या डीबी पथकाने तिघा आरोपींना ताब्यात घेत अटक केली. तपासाअंती हत्येचे नेमके कारण समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here