राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा विचार करत राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहनांना वार्षिक वाहन करात ५० टक्के सवलत दिली आहे. ३१ मार्च २०२० रोजी मागील आर्थिक वर्षांचा पूर्ण वाहन कर जमा केला असेल त्या वाहंधारकांना एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी ही सवलत दिली जाणार आहे.
२३ मार्च २०२० पासून पुढे सलग साडेचार महिने कमी-अधिक प्रमाणात टाळेबंदी सुरु होती. त्यामुळे वाहन करामधे किमान सहा महिन्यांची सवलत मिळावी अशी वाहन क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी होती. उत्पन्न बंद झालेले होते त्यामुळे कर जमा करणे शक्य नसल्याचे या व्यावसायीकांचे म्हणणे होते. सरकारने या मागणीची दखल घेत त्यांचा सहा महिन्यांचा कर माफ करण्यात आला आहे.
कोरोना काळात आधीच अडचणीत असलेल्या मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कँपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक अशा विविध स्वरुपाच्या वाहतुकदार व्यावसायिकांना या सवलतीचा फायदा होणार आहे. या वाहन मालकांनी त्यांचा एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या आर्थिक वर्षाचा संपुर्ण वाहन कर ३१ मार्च २०२० पर्यंत किंवा त्यापुर्वी शासनाकडे जमा केला असेल तरच त्यांना पुढील आर्थिक वर्षासाठी ही सवलत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.