मद्यपानानंतर झालेल्या वादातून तरुणाचा खून

On: October 6, 2025 7:57 AM

जळगाव : जळगावच्या गेंदालाल परिसरात राहणा-या तरुणाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे धारदार शस्त्राने खून झाल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी 5 मे च्या रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेतील संशयितांमधे जळगाव शहराच्या माजी महापौरांच्या मुलाचा समावेश आहे.  

जितेंद्र राजेंद्र साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या कंडारी येथे जितेंद्र साळुंखे याच्यसह चौघे जण गेले होते. त्याठिकाणी एका हॉटेलमधे मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादातून जितेंद्र साळुंखे याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तो जागीच मरण पावला. सुरुवातीला खासगी रुग्णालयात व नंतर जळगाव येथे शासकीय रुग्णालयात त्याचा मृतदेह हलवण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून संशयीत आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment