मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ नाही

मुंबई : कोरोनारुपी मुकाबला करणाऱ्या मुंबईकरांना महापालिका मालमत्ता करात सवलत मिळणार आहे. ५०० चौरस फुटांवरील मालमत्तांना यापुर्वीच करमुक्त करण्यात आले आहे. आता पाचशे फुटांवरील मालमत्तांच्या करात दर पाच वर्षांनी होणारी आठ टक्के वाढ या वर्षी होणार नाही. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे महापालिका प्रशासनाने पाठवला आहे.

मुंबईत चार लाख २० हजार मालमत्ता असून एक लाख ३७ हजार मालमत्ता या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या आहेत. या मालमत्तांचे कर अगोदरच माफ केले आहेत. उर्वरित दोन लाख ८३ हजार मालमत्ता धारकांकडून कर वसूल करण्यात येतो.

जकात कर रद्द केल्यानंतर मालमत्ता कर हेच महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत समजले जाते. या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत निर्माण झालेल्या सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करण्यात आला आहे. मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला जकात कर सन २०१७ मध्ये रद्द झाला आहे. मात्र, या करातून दरवर्षी सुमारे साडेसात हजार कोटी उत्पन्न मिळते. त्यामुळे राज्य सरकारकडून वस्तू व सेवा कराच्या परताव्याच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला ठरावीक रक्कम नुकसानभरपाईच्या रुपाने दिली जाते. मात्र, जकात कर रद्द झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचे मोठे स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात यावेळी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आणखी सवलत दिल्यास महापालिका आर्थिक अडचणीत येईल. मात्र, या वर्षी मालमत्ता कर माफ केल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तत्कालीन स्थितीनुसार योग्य तो धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here