बॉलीवुड अभिनेते अजून बाकी आहेत : अ‍ॅड. उज्वल निकम

“ड्रग्ज” या विषयाने चित्रपटसृष्टीत सध्या खळबळ उडवली आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर ड्रग्जशी संबधीत विविध नट्यांची नावे पुढे आली. याबाबत वरिष्ठ वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की अद्याप केवळ बॉलिवूड अभिनेत्रींची नावे उघड झाली असून अभिनेत्यांची नावे उघड झालेली नाहीत.

अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने सखोल चौकशी करत आहे. अशा परिस्थितीत हा मुद्दा केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये. मात्र प्रत्येकाचे वास्तव समोर यायला हवे. बॉलिवूड गँगवर बोलताना अ‍ॅड. निकम म्हणाले की, “दुबई स्थित काही लोकांच्या मदतीने बॉलिवूडमधील काही लोकं आपले अस्तित्व तयार करायचे.

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने आतापर्यंत जवळपास २० जणांना अटक केली आहे. या प्रकरणी बरीच मोठी नावांची यादी समोर आली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर या नावांचा त्यात समावेश आहे. एनसीबीने या सर्व लोकांना चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीने सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची नावे उघड केली आहेत.

एनसीबीने बुधवारी अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर व रकुल प्रीत सिंग या चौघांना ड्रग्स प्रकरणी समन्स पाठवले आहेत. एनसीबीने दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला सुद्धा चौकशीकामी समन्स पाठवले आहे. करिश्माने प्रकृतीचे कारण पुढे करत 25 सप्टेंबरपर्यंतची वेळ मागून घेतली आहे.
सन 2019 मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या कथित ड्रग्स पार्टीचा व्हि़डीओ फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासकामी पाठवण्यात आला आहे. एफएसएल आता त्या व्हिडिओची पडताळणी करणार आहे. या पार्टीत दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन आणि रणबीर कपूर अशा कलाकारांची हजेरी दिसून आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here