खंडणी घेतांना एमआयएम जिल्हाध्यक्षाला भिवंडीत अटक

भिवंडी : ठाणे एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भिवंडी एमआयएमचा जिल्हा अध्यक्ष खालिद उर्फ गुड्डु शेखसह चौघा साथीदारांना एका बांधकाम व्यवसायिकाकडून एक लाख रुपये खंडणी घेतांना रंगेहात अटक करण्यात आली. सदर घटना मध्यरात्री उघडकीस आली.

या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. खालिद गुड्डू याच्यासह त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान यांना पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेकडे खालिद गुड्डू व त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी खालीद गुड्डू यास सापळा रचून पकडण्यात आले. त्यावेळी आरोपी खालीद व त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान यांना तक्रारदाराकडून एक लाख रुपये खंडणीची रक्कम घेतांना रंगेहात अटक करण्यात आली.

याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस स्टेशनला कलम 364 अ, 386, 387, 34 आर्म कायदा 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक क्र.1 हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here