मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरु झालेला तपास हळूच इडीच्या वळणावर गेला. त्यानंतर या तपासाने ड्रग्जच्या दिशेने आपली वाटचाल सुरु केली आहे. सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू नेमका कशाने झाला हा तपास बाजूला पडून रियाची इडीकडून चौकशी सुरु झाली. इडीच्या कचाट्यातून ती बाजूला पडत नाही तोवर तिला एनसीबी (ड्रग्ज)च्या तपासाने घेरले. अखेर ती एनसीबीच्या कचाट्यात सापडून जेलमधे गेली.
अशा प्रकारे सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूचा तपास आता ड्रग्जच्या वळणावर आला आहे. या निमीत्ताने बॉलीवूडच्या कलाकारांची काळी बाजू पुन्हा एकवेळा समोर आली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलावंत अमली पदार्थ सेवन करत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलावंतांना अंमली पदार्थ पुरवत असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून 139 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थाचे बाजारमूल्य साडेपाच लाख रुपये आहे. उस्मान अन्वर अली शेख (40) असे अटकेतील एका आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरी पश्चिम येथे राहतो. अंमली पदार्थ विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय आहे.
चित्रपट सृष्टीतील काही नामवंत कलाकारांची देखील या निमीत्ताने चौकशी सुरु आहे. त्यांना देखील उस्मान शेख अंमली पदार्थ पुरवत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. उस्मान हा झोमॅटो या हॉटेल मधील खाद्यपदार्थ घरपोच देणा-या कंपनीत काम करतो. या कामाच्या आडून तो ग्राहकांना अमली पदार्थ पुरवत असल्याचे पुढे आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांना आपल्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीच्या ओशिवरा नजीक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. तो या ठिकाणी या ठिकाणी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यासाठी आला होता. त्याचवेळी त्याला 139 ग्राम वजनाच्या अमली पदार्थासह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या मालाचे बाजारमुल्य साडेपाच लाख रुपये आहे.
चौकशीअंती त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आबु सुफुया खान याचे नाव पुढे आले. आबू हा एमडी पुरवत असल्याचे उस्मान याने सांगितले. तो चित्रपट सृष्टीतील काही व्यक्तींना देखील अमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती पुढे आली. या दोघांची चौकशी सुरु आहे. यातून हिंदी चित्रपट सृष्टीतील बडे कलाकार गळाला लागतील असे दिसून येत आहे.