आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच घेणार रुग्णवाहिका

रावेर : हमीद तडवी याजकडून

आदिवासी तडवी भिल एकता मंच सामाजिक संघटना लवकरच रुग्णवाहिका घेणार आहे. समाजातील गोरगरिब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा या उदात्त हेतूने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर ऐनवेळी गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळत नाही. गोरगरिब आदिवासी समाजासह समाजातील सर्वच घटकातील रुग्णांना एक एक क्षण लाख मोलाचा असतो. रुग्णांचा जीव वाचावा, त्यांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच ही एक अशी सामाजिक संघटना आदिवासी बांधवांवर अन्याय,अत्याचार होऊ देत नाही.तळागाळातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवुन देण्यासाठी आदिवासी संघटनेचे समाजसेवक,पदाधिकारी मदतीसाठी सदैव तत्पर असतात, हेच ह्या आदिवासी तडवी भिल एकता मंच सामाजिक संघटनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here