मुंबई : तपासातील बारकावे इडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणेकडून प्रसार माध्यमांना दिले जातात. या संस्थांनी निवडक माहिती माध्यमांना देण्यामागे काही तरी अजेंडा आहे. कुणाला तरी बदनाम करायचे आहे किंवा या गुन्ह्यातून जे काही निष्पन्न होईल त्याच्याशी त्यांचे सोयरसुतक नसावे असा याचा अर्थ निघत असल्याचे मत जेष्ठ विधिज्ञ अॅड. उज्वल निकम यांनी एका यु ट्युब वरील मुलाखतीत दिले आहे.
या यंत्रणांना प्रसिद्धीचा हव्यास जडला असल्याचे देखील अॅड. निकम यांनी बोलतांना म्हटले आहे. ईलेक्ट्रॉनिक मीडियाकडून गुन्ह्याच्या साक्षीदारांना पॅनलवर बोलावले जाते. त्यांची मुलाखत घेतली जाते. तपास यंत्रणेला दिलेला जवाब आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाला दिलेल्या जवाबात फरक असतो. याचा फायदा आरोपीला होत असतो.
तपास यंत्रणांना खडे बोल सुनावण्यास सरकार का मागे पुढे पाहते? याचे उत्तर अद्याप आपल्याला सापडले नसल्याचे अॅड. निकम यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणांवर वेळीच लगाम घातला पाहिजे असे देखील अॅड. निकम यांनी म्हटले आहे.
योग्य बोलतायत मा निकम साहेब .