जळगाव : आजचा दिवसभरात आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या. एका घटनेत भुसावळ शहरानजिक तापी नदीच्या पुलावरुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. दुस-या घटनेत विदगाव नजीक तापी नदीच्या पुलावरुन तरुणाने आत्महत्या केली.
दुस-या घटनेतील आत्महत्या करणा-या तरुणाची दुचाकी विदगाव पुलावर आढळून आली. सदर तरुण चंद्रकांत शांताराम मराठे हा असल्याचे निष्पन्न झाले. चंद्रकांत मराठे हा तरुण जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी होता.
तो स्टेडीयम नजीक असलेल्या भारत एंटरप्राईजेस येथे सेल्समन म्हणून नोकरीला होता. २९ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता तो घरातून त्याच्या ताब्यातील दुचाकीने बाहेर पडला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याच्या बेपत्ता होण्याची खबर जळगाव शहर पोलिस स्टेशनला 30 सप्टेबर रोजी दाखल करण्यात आली. त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी त्याची दुचाकी विदगाव पुलावर आढळून आली. त्यावरुन त्याने नदीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचा अंदाज लावण्यात आला.
आज शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह चोपडा तालुक्यातील दोंदवाडे – तांदळवाडी शिवारात दुपारी एक वाजेच्या सुमारास परिसरातील गुराख्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी दोंदवाडे गावाचे पोलिस पाटील यांना माहिती दिली. त्याच्या खिशातील वाहन चालवण्याच्या परवान्यावरुन त्याची ओळख पटली. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस करत आहेत.