औरंगाबाद : आज सोमवारच्या पहाटे सकाळी सव्वापाच वाजता औरंगाबाद पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन खणखणला.
फोन वाजताच इकडून संबंधीत अधिका-याने फोन उचलला. इकडून काही बोलण्याच्या आधीच पलीकडून आवाजा आला.
हॅलो… हॅलो… मी ……अतिरेकी बोलतोय…… औरंगाबाद रेल्वेस्टेशन परिसरात बॉम्ब ठेवलेला आहे….इकडून काही बोलण्याच्या आधीच पलीकडून फोन कट झाला. हा निरोप समजताच औरंगाबद पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकारी वर्गात एकच धावपळ उडाली.
पटापट सगळा पोलिसांचा फौजफाटा औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरात जमा झाला. रेल्वे स्टेशन परिसराची कसून चौकशी करण्यात आली. ……… मात्र सुदैवाने तसा काहीच प्रकार आढळून आला नाही.
पोलिस पथकाने सुटकेचा निश्वास टाकला असला तरी सर्वांची मानसिकता खराब झाली होती. हा फोन कुणी केला? हा खोडसाळपणा कशासाठी व कुणाच्या सांगण्यावरुन करण्यत आला याची चौकशी सुरु आहे.