मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज चौकशीत अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्ज खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती व इतरांची आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार होती. याप्रकरणी मंगळवारी सुनावणीच्या वेळी मुंबई न्यायालयाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. त्यानंतर, आज न्यायालयाने रियाला अटी शर्थीवर जामीन मंजूर केला आहे. मात्र शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
मागील सुनावणीच्या वेळी विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. एनसीबीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती व इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यास सांगण्यात आले होते.
मुंबई उच्च न्यायलयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा व दिपेश सावंत यांचा जामीन मंजूर केला. रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजुर करण्यात आला आहे. पुढील 10 दिवस 11 ते 5 वाजेच्या दरम्यान रियाला नजीकच्या पोलिस स्टेशनला हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.