नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या गाझियाबाद जिल्ह्यात बिजेपी आमदाराच्या मामाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजपा आमदार अजीत पाल यांचे मामा नरेश त्यागी असे हत्या झालेल्या नातेवाईकाचे नाव आहे. सिहानी गेट पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. नरेश त्यागी हे सकाळी मॉर्निंग वॉक करत असतांना स्कुटीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली. या घटनेच्या चौकशीकामी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हत्या झालेले नरेश त्यागी हे सरकारी बांधकाम ठेकेदार होते. पुढील तपास सुरु आहे.