मुंबई : एमपीसी (मॉनेटरी पॉलीसी कमिटी) ची बैठक गेल्या 7 ऑक्टोबरपासून सुरु आहे. याप्रकरणी आज अंतिम निर्णय जाहीर झाला आहे. काही महत्त्वाचे निर्णय यावेळी आरबीआयद्वारे घेण्यात आले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास अध्यक्ष असणाऱ्या या सहा सदस्यीय मॉनिटरी पॉलिसी समितीने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट चार टक्क्यांवर कायम राहणार असल्याचा निर्णय सर्व सदस्यांच्या संमतीने घेण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के कायम राहणार आहे.
रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की सध्या देशातील आर्थिक आकडेवारीतून चांगले संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचे संकेत प्राप्त होत आहेत.
मॅन्यूफॅक्चरिंग व रिटेल विक्रीत देखील अनेक देशांमधे रिकव्हरीची प्रक्रीया सुरु झाली आहे. एक्सपोर्ट मधे देखील विविध देशात सुधारणा झाली आहे. मार्च तिमाही दरम्यान जीडीपी सकारात्मक होण्याचा विश्वास दास यांनी व्यक्त केला आहे.
शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत तेजी येण्याची आशा दिसून येत आहे. महामारीच्या या संकटात सध्या कोरोना संक्रमण थांबवण्याशिवाय आर्थिक सुधारणांवर देखील लक्ष दिले जात आहे.
रेपो रेट चार टक्क्यावर कायम राहील. रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के कायम राहील. सर्व सहा सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंच एमपीसी कडून 2.50 टक्के इतकी कपात व्याजदरात केली आहे.