तीन वाहिन्यांना जाहिराती न देण्याचा राजीव बजाज यांचा निर्णय

नवी दिल्ली : समाजात विद्वेष पसरवून सामाजिक वातावरण दूषीत करणा-या तीन वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय बजाज ऑटो कंपनीने निर्णय घेतला आहे. या तिघा वाहिन्यांना काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली. असे असले तरी त्या तिन वाहिन्या कोणत्या आहेत हे त्यांनी उघड केले नाही.

चॅनलचा टीआरपी वाढवण्याचे रॅकेट उघडकीस आल्याचे प्रकरण ताजे असतांनाच बजाज ऑटो कंपनीने ही घोषणा केली आहे.

उद्योगपती राजीव बजाज यांनी म्हटले आहे की तुमचा ब्रँड उत्तम व विश्वासार्हतेच्या बळावर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवता येतो. पाया भक्कम असलेल्या व्यवसायातून समाजहिताच्या गोष्टी देखील करता येतात.

समाजात विद्वेष पसरवणा-या समुहाशी बजाज ऑटो संबंध ठेवू इच्छित नाही. त्यामुळेच या तीन दूरचित्रवाहिन्यांना जाहिराती यापुढे न देण्याचे व्यवस्थापनाने ठरवले आहे. ते पुढे म्हणाले की, कोणती दूरचित्रवाहिनी अथवा वृत्तपत्र समाजात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करते हे आम्हाला लगेच समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here