लोकपत्रिका न्यूजचे किरण चव्हाण यांची निवड

On: October 14, 2020 9:08 AM

जळगाव : वेब मिडीया असोसिएशनची मुंबई येथे मुंबई येथे नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. वेब मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सचीव गणेश पुजारी यांनी कार्यकारिणीची दुसरी यादी जाहीर केली.

या कार्यकारिणीत अमळनेर येथील पत्रकार तथा शिक्षक तसेच उत्तम वक्ता, लेखक, कवी आणि आदर्श सुत्रसंचालक असे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व किरण चव्हणा यांची जळगाव जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

वेब मीडिया असोसिएशन ही रजिस्टर्ड असोसिएशन आहे वेब मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यभर पत्रकारांचे संघटन उभे केले आहे. वेब पोर्टलच्या माध्यमातून वृत्त संकलन करतांना येणा-या अडीअडचणी ते संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात.

पोर्टल जगताला एक आगळी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर ते प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी त्यांनी वेब असोसिएशनची झूम मीटिंगद्वारे पत्रकारांशी संपर्क साधला. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर त्यांचे एक मोठे संघटन उभे राहणार आहे.

जळगाव जिल्हा संघटक पदी निवड झालेले किरण चव्हाण हे अमळनेर तालुक्यातील खेडी(अमळगाव) येथील रहिवासी आहेत. गेल्या १९ वर्षांपासून ते पत्रकारितेच्या माध्यमातून सक्रीय आहेत. आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील ते शिक्षकी सेवा बजावत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment