ड्रग्ज प्रकरणी विवेक ओबेरॉयच्या घरावर धाड

On: October 15, 2020 6:33 PM

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर देखील धाड टाकण्यात आली. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणी विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याचे नाव आले आहे. तो सध्या गायब आहे. त्यामुळे आता त्याच्या तपासकामी बंगळुरु पोलीस मुंबईत आले असून ते विवेक ओबेरॉय याच्याकडे तपास करत आहेत.

विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आदित्य अल्वा हा बंगळुरु ड्रग्ज प्रकरणी आरोपी आहे. आदित्य अल्वा हा कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचा मुलगा आहे. ड्र्ग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर आदित्य गायब झाला आहे.

त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसदेखील जारी करण्यात आली असून तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरु पोलिसांना समजली आहे. फक्त बॉलिवूडच नव्हे तर सँडलवूड ड्रग्ज कनेक्शन देखील पुढे आले आहे. कन्नड फिल्म उद्योगतील सेलिब्रिटीज देखील ड्रग्ज सेवन करत असल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय गुन्हे शाखेकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. अभिनेत्री रागिनी द्विवेदीसह काही जणांना यापुर्वी अटक झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment