आसोदा गावी प्रौढाने घेतला गळफास – संपवली जीवनयात्रा

On: October 17, 2020 9:05 PM

जळगाव : आसोदा येथील एकाने गावातील गुरांच्या दवाखान्यातील पडक्या खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

साहेबराव शामराव पाटील (रा.आसोदा) असे मयत इसमाचे नाव असून या प्रकरणी पोलिस पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव तालुका पोलिसात 98/20 या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. आज सकाळी हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

सदर अकस्मात मृत्यूची नोंद सहायक फौजदार लालसिंग पाटील यांनी दाखल केली असून तपास अरुण सोनार करत आहेत. दरम्यान घटनास्थळाला पो.नि. अनिल बडगुजर यांनी भेट दिली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment