रावेर हत्याकांड गुन्ह्यात बलात्काराच्या कलमाची वाढ – डॉ. दिघावकर

ललित खरे / हमीद तडवी याजकडून

जळगाव : रावेर येथील चौघा भाऊ बहिणींची सामुहीक हत्या ही निंदनीय घटना असून या घटनेतील तपासात परिस्थीतीजन्य पुरावा प्राप्त झाला आहे. या गुन्ह्यात बलात्काराच्या 376 (अ) या कलमाची काही वाढ करण्यात आली आहे.

आज सायंकाळी रावेर पोलिस स्टेशनला विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांची पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली. यावेळी डॉ. दिघावकर बोलत होते. यावेळी बोलतांना डॉ. दिघावकर यांनी म्हटले की या हत्याकांड प्रकरणी सुरु असलेल्या तपासादरम्यान मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यानुसार 376(अ), 452, लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 10, 12 अन्वये या कलमांची वाढ करण्यत आली आहे. तसेच अजून पुरावे संकलीत करण्याचे काम देखील सुरुच आहे.

रावेर शिवारात बोरखेडा रस्त्यालगत असलेल्या शेतात दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेत मालक त्यांच्या शेतात गेले असता त्यांना शेतमजुराचे घर बंद आढळून आले. त्यामुळे त्यांनी मुले उठली की नाही म्हणून आवाज दिला असता त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.घराचा दरवाजा आतून लोटलेला होता. दरवाजाच्या आत मधे लोखंडी पत्र्याची पेटी लावलेली होती. ती सरकवून आत गेल्यावर चौघे मुले मयत अवस्थेत त्यांना आढळून आले.त्यांच्या गळयावर धारदार शस्त्राने वार केल्याचे व गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले.

या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला भाग – 5 गु.र.न. 188/20 भा.द.वि.क.302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला. मात्र तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यानुसार या प्रकरणी 376(अ), 452, लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,10,12 या कलमान्वये वाढ करण्यात आली आहे.

या गुन्हयांचे गांभिर्य ओळखुन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना तपासकामी सुचना दिल्या होत्या. तसेच तात्काळ घटनास्थळावर भेट दिली होती.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी या गुन्हयाच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामिण , धुळे व नंदुरबार येथील पथके तसेच सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा – जळगाव उपविभाग, नरेंद्र पिगळे फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बापु रोहोम, नाशिक ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.के.के.पाटील, रावेर पोलिस स्टेशनचे पो.नि. रामदास वाकोडे, स.पो.नि.शितल नाईक, उप निरिक्षक मनोज वाघमारे, उप निरिक्षक सुधाकर लहारे, उप निरिक्षक रोहीदास ठोंबरे, नंदुरबारचे पोलिस उप निरिक्षक योगेश राऊत, पोलिस उप निरिक्षक राजेंद्र पवार यांच्यसह रावेर पोलीस स्टेशनचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपास कामी रावेर शहरासह इतर ठिकाणी रवाना केले होते.

या गुन्हयाचा तपास प्रगतीपथावर असताना परिस्थितीजन्य पुरावा प्राप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या तपासात अधिक पुरावा संकलीत करण्याचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here