सांडपाण्यावरुन झाला वाद, चाकू हल्ल्यात एक बाद

काल्पनिक छायाचित्र

धुळे : धुळे तालुक्यातील मुकटी येथे सांडपाण्यावरुन वाद झाला होता. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चाकू हल्ल्यात एकाची हत्या झाल्याची घटना रविवारी सायंकाळी झाली होती. या प्रकरणी आज पहाटे एक वाजता फिर्याद दाखल झाल्यानंतर सव्वा दोन वाजता हल्लेखोर संशयीतास पकडण्यात पोलिसांना यश आले.

धुळे तालुक्यातील मुकटी येथील सुरेश भिला पाटील व दादा दौलत पाटील यांच्यात सांडपाण्यावरुन रविवारी सकाळी वाद झाला होता़. हा वाद मिटवण्याकामी भैय्या दौलत पाटील व इतर लोक एकत्र जमले होते. सर्वांनी मिळून सामंजस्याची भूमिका घेत वाद मिटविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला़ होता.

यावेळी वाढत जाणारा वाद कमी झाला नाही. या वादाच्या वेळी झालेल्या चाकू हल्यात भैय्या दौलत पाटील, धनराज दौलत पाटील, रविंद्र धनराज पाटील यांना जबर दुखापत झाली़.

धनराज पाटील याच्या छातीवर चाकूने वार झाल्यामुळे तो जागीच मृत्युमुखी पडला. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.

या घटने प्रकरणी भैय्या दौलत पाटील (३४),लक्ष्मीनगर, मुकटी, ता़ धुळे याने पहाटे १ वाजता तालुका पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. संशयित दादा दौलत पाटील (२५), लक्ष्मीनगर, मुकटी ता़ धुळे याच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०७, ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने पहाटे सव्वा दोन वाजता संशयित दादा दौलत पाटील याला अटक केली़ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here