१ नोव्हेंबर 2020 पासून देशभरात घरगुती गॅस सिलिंडर वितरणासंबंधी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डिएसी) राबविण्याचा नियम तुर्त टाळण्यात आला आहे. अद्याप 70% ग्राहकाचा मोबाईल नंबर गॅस कनेक्शनला जोडलेला नाही. ज्या ग्राहकाचा मोबाईल नंबर गॅस कनेक्शनला जोडलेला नाही त्याच्या मोबाईलवर डिएसी येणार नाही. ही अडचण लक्षात घेत हा निर्णय सरकरट राबविण्याचा निर्णय तूर्त मागे घेण्यात आला आहे.
1 नोव्हेंबरपासून दिल्लीसह देशातील 100 स्मार्ट सिटीमधे सिलिंडर वितरणासाठी 1 नोव्हेंबरपासून गॅस ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी आल्यानंतरच त्यांना सिलिंडरचे वितरण केले जाणार होते. यामुळे काळाबाजारास अटकाव केला जाणार होता.
डीएसी कोडच्या माध्यमातूनच ग्राहकांना सिलिंडरचे वितरण केले जाणार होते. हा कोड डिलिव्हरी बॉयला दिल्यानंतर त्याने त्याच्याकडील अॅपवर तो कोड टाकल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर मिळणार होते. यासाठी ज्या ग्राहकांचा मोबाईल क्रमांक लिंक केलेला अथवा अपडेट केलेला नसल्यास तो अॅपद्वारे अपडेट करता येईल. हे अॅप डिलिव्हरी बॉयकडे देखील राहणार आहे.
या नव्या नियमामुळे लाखो ग्राहकांचा त्रास वाढणार होता. अनेकांचे चुकीचे पत्ते, चुकीचे मोबाईल क्रमांक नोंदवले गेले आहेत. अनेकांचे मोबाईल क्रमांक बदलले आहेत. यामुळे कित्येक ग्राहकांना सिलिंडर मिळविणे त्रासदायक होणार होते.
ही योजना केवळ घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी आहे. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरसाठी ही योजना राहणार नाही.