एलसीबीने पकडला अवैध वाळूचा ट्रक

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघा कर्मचा-यांना पेट्रोलींग दरम्यान संशयास्पद स्थितीत मिळालेल्या ट्रकची झडती घेतली असता त्या ट्रकमधून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

पो.नि. किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेची धुरा हाती घेतल्यानंतर वाळू व्यावसायीकांवर ही पहिलीच कारवाई आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक नितीन बाविस्कर व प्रितम पाटील हे दोघे कर्मचारी दुचाकीने पेट्रोलींग करत होते. दरम्यान जळगाव शहरातुन जाणा-या महामार्गावर शिव कॉलनी नजीक सकाळी त्यांना ताडपत्रीने माल झाकलेल्या अवस्थेत एक ट्रक(एमएच 19 झेड 2826) हा भुसावळच्या दिशेने जातांना दिसला. ट्रक धावत असतांना ट्रक मधून मागच्या बाजूने पाणी गळत होते.

त्यामुळे या ट्रकबद्दल दोघांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांनी ट्रक अडवून झडती घेतली असता त्यामधे तिन ब्रास वाळू भरलेली होती. ट्रक चालक सुभाष गडबड नन्नवरे (धरणगाव) याच्याकडे या वाळू वाहतूकीचा कोणतीही महसुली परवाना नव्हता. त्यामुळे हे वाहन दोघा कर्मचा-यांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला जमा करत पुढील कायदेशीर कारवाई पुर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here