मुंबई : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेतील अर्णब गोस्वामींना आज तळोजा कारागृहात रवाना करण्यात आले. त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यामागे सुरक्षेचे कारण नसून त्यांनी सब जेलमधे मोबाईल वापरला असल्याचे कारण समोर आले आहे.
अर्णब गोस्वामींना अलिबाग न.पा.च्या शाळेत आरोपींसाठी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले होते. तळोजा जेलमध्ये रवानगी होत असतांना गोस्वामी यांनी पोलीस व्हॅनच्या खिडकीतून आपल्याला मारहाण झाल्याची ओरड केली होती. न्यायालयाला मदत करण्यास सांगा असे गोस्वामी यांनी म्हटले होते.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तपास अधिकारी जमील शेख यांना अर्णब गोस्वामी सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असल्याचे समजले. ते अन्य कुणाचातरी मोबाईल वापरत होते असे त्यांना आढळून आले. त्यांचा मोबाईल फोन अगोदरच जप्त करण्यात आला होता. अर्णब गोस्वामी यांच्याकडे फोन कसा व केव्हा आला याची तपासणी केली जाणार आहे.