आमीर खान, माधुरी दिक्षीत नाशिकला

On: November 8, 2020 9:58 PM

नाशिक : आज रविवारच्या दिवशी सकाळी अभिनेता आमीर खान याने नाशिक शहरात हजेरी लावली. एका चित्रपटाच्या शुटींगसाठी आमीर यास स्पॉट हवे आहेत. त्या स्पॉटची पाहणी करण्यासाठी आमीर खान नाशकात आला होता.

आज अचानक गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान याने हजेरी लावली. यावेळी अकॅडमीचे संचालक रतन लथ आणि शर्वरी लथ यांनी त्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. दुपारच्या वेळी त्याने शहरात काही स्पॉटची पाहणी देखील केली.

नाशिक शहर चित्रीकरणासाठी प्रसिद्ध होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. एका चित्रपटाचे काही सीन शूट करण्याकामी आमीर यास काही स्पॉटची निवड करायची होती. काही स्पॉटची पाहणी केल्यानंतर आमीर खान पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाला.

सध्या नाशकात माधुरी दीक्षितचे शूटींग सुरु आहे. तिच्या भेटीसाठी देखील आमीर गेला होता. आमीर खान नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात शुटींग करणार असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय कुमार देखील नाशकात काही दिवसांपुर्वी नाशकात येवून गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment