पाटणा : योगगुरु बाबा रामदेव व पतंजली आयुर्वेद या संस्थेचे संचालक आचार्य बालकृष्ण यांनी कोवीड 19 च्या उपचारासाठी औषध तयार केल्याचा दावा केला होता. हा दावा करत त्यांनी जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप या फौजदारी तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही जणांविरुद्ध फसवणूकीसह गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे तसेच इतर काही आरोपांची तक्रार दाखल करण्याची मागणी मुझफ्फरपूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांच्या न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायालयाने हे प्रकरण 30 जून रोजी सुनावणीसाठी ठेवले आहे.