मुंबई : क्रिकेट खेळाडू कृणाल पांड्या यास गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल संचलनालय यंत्रणेकडून रोखण्यात आले. कृणालने युएई येथुन परत येतांना नियमापेक्षा जास्त प्रमाणात सोने व महागडी घड्याळे आणली. या सोन्याची व घड्याळांची माहिती त्याने महसुल संचलनालयास दिली नव्हती. संचलनालयास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार त्याला विमानतळावर रोखण्यात आले.
त्याच्याकडे ऑडेमर्स पिज्युएट डायमंडची दोन आणि रोलेक्स मॉडेल्सची दोन अशी एकूण चार महागडी घड्याळे मिळून आली. या घडाळ्यांची माहीती त्याने महसूल विभागाला देणे आवश्यक होते. या घड्याळ्यांची किमंत एक कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्याच्या ताब्यातील घड्याळे जप्त केल्यानंतर त्याला घरी जावू देण्यात आले.
घडयाळावरील दंड आणि कर जमा केल्यानंतर ती घड्याळे त्याला परत दिली जातील असे समजते. या घड्याळाच्या किमतीच्या 38.5 % कर त्याला द्यावा लागणार आहे.