कोलकाता : बंगाली सिनेसृष्टीसह रंगमंचावरील ‘दिग्गज’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे आज रविवार (15 नोव्हेंबर २०२०) दुपारी 12.15 वाजता निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. गेल्या चाळीस दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. अखेर कोलकत्याच्या ‘बेले व्यू क्लिनिक’ या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सौमित्र यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यामुळे 6 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. मात्र त्यांना श्वास घेण्यात अडथळे येवू लागले. दरम्यान त्यांचे मूत्रपिंड देखील निकामी झाले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. चाळीस दिवसांच्या संघर्षानंतर त्यांचा मृत्युसोबतचा सामना संपला. सौमित्र चटर्जी यांचा सन 2004 साली पद्मभूषण तर सन 2012 मधे दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.