महाविद्यालयीन तरुणीस वारंवार फोन/मेसेज करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा

जळगाव : “डर” चित्रपटातील खलनायकाप्रमाणे तरुणीला वारंवार त्रास देणा-या तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी सदर त्रस्त तरुणीस मानसिक पाठबळ दिल्यानंतर तिने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सदर तरुणी जळगाव येथील रहिवासी असून दोंडाईचा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे सदर तरुणी घरुन ऑनलाईन शिक्षण घेत आहे.

फेब्रुवारी 2019 पासून आतापावेतो या तरुणीस कुणीतरी खोडसाळपणा करत तिच्या मोबाईलवर अश्लील संदेश पाठवत होता तसेच फोन देखील करत होता. आतापर्यंत या त्रस्त तरुणीला पलिकडून कुणीतरी अनोळखी तरुणाने तब्बल 43 पेक्षा अधिक वेळा अश्लिल संदेश पाठवले आहेत तसेच फोन देखील केले आहेत. मात्र या अश्लिल संदेशाकडे सदर महाविद्यालयीन तरुणीने वेळोवेळी दुर्लक्ष केले. तसेच त्याचे फोन देखील उचलले नाही. दरम्यान तिच्या मोबाईलवर संदेश व फोन येणे बंद झाले नाही. शेवटी शेवटी फोन करणा-याची ओळख पटवण्यासाठी तरुणीने फोन उचलण्यास सुरुवात केली. मात्र पलीकडून कुठलाही रिप्लाय मिळत नव्हता.

पिडीत व त्रस्त महाविद्यालयीन तरुणीने माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांच्या मदतीने जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठत या प्रकरणी रितसर फिर्याद दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here