अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या – सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावे

On: November 20, 2020 12:01 PM

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील शेजाऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये रा. काँ.च्या स्थानिक नेत्यांची नावे आहेत. या नावांमुळे बारामती येथे खळबळ माजली आहे. मयत व्यक्तीच्या मुलाने या बाबत बारामती पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून तिघे फरार आहेत.बारामती येथील व्यापारी प्रीतम शहा यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये अवैध सावकारीवरुन काहीजण पैशांसाठी छळ करत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळेच आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. व्यापारी प्रीतम शहा यांच्या मुलाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.प्रीतम शहा यांच्या तक्रारीत नगरसेवक जयसिंह अशोक देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी उर्फ सुनील आवळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमसे यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. यातील एकजण बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष असून बहुतांश जण राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत.

आरोपीतांमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेच्या संचालकांचा समावेश आहे.बारामती पोलिसांनी सावकारीच्या माध्यमातून व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या नऊ जणांपैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी प्रीतम शहा यांना तीस टक्के व्याजदराने रक्कम दिली होती. प्रीतम शहा यांनी घेतलेले पैसे परत देखील केले होते.मात्र जादा रक्कम वसुलीसाठी आरोपींनी प्रीतम शहा यांच्या मागे सतत तगादा लावला होता.

त्यामुळे वैतागून प्रीतम शहा यांनी आत्महत्या केली. या प्रकरणावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. ज्या निकषावर अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करणे झेपेल काय? असा खोचक सवाल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment