जळगाव : चारचौघात ठळकपणे खुलून दिसणारी कामिनी लग्नाच्या वयात कधीच आली होती. ती पंचवीस वर्षाची झाली होती. कामिनी दिसायला देखणी व त्यातल्या त्यात बॅकेत जॉब करणारी अर्थात कमावती होती. बॅंकेत जॉब करणारी देखणी व कमनीय बांध्याची कामिनी अर्थातच बुद्धिजीवी होती हे सांगले न लगे. ब्युटी अलॉंग वुईथ नॉलेज असे तिचे वर्णन करता येईल.
रुपवान कामिनीला सरस्वती प्रसन्न झाली होती. विद्या तिच्या अंगी बहरलेली होती. याशिवाय परमेश्वरने तिला देखण्या रुपाचा अनमोल ठेवा देखील दिला होता. विना मेक अप, विना ब्युटी पॉर्लर तिच्या रुपाचा झरा खळखळून झरझर वहात होता.
लग्नायोग्य कामीनीच्या लग्नाचा योग कधी जुळून येईल याची चिंता तिच्या पिताश्रींना लागून होती. आपल्या कन्येच्या नशिबात कोणत्या गावचा राजकुमार आहे? त्याचे उत्पन्न भरदम असेल का? त्या राजकुमाराकडे आपली कन्या सुखी राहील का? असे एक ना अनेक प्रश्न कामिनीच्या पिताश्रींना नेहमी पडत होते. पिताश्रींची चिंता म्हणजे आपली चिंता असे समजून कामिनी स्वत:च तिच्यासाठी ऑनलाईन वरसंशोधन करत होती. समाजाच्या मॅट्रीमोनीयल संकेत स्थळावर ती दररोज व्हिजीट देत असे. तिचा स्वप्नातील आणि पिताश्रींच्या मनाला समाधान देणारा राजकुमार ती स्वत:च शोधत होती.
जळगाव शहरातील एका सुसंपन्न कॉलनीत कामिनी आपल्या आईवडीलांसह रहात होती. समाजाच्या संकेत स्थळावरील एक स्थळ सर्वांना योग्य वाटले. त्या संकेत स्थळावरील “उपवर” तरुण जळगाव शहरातीलच रहिवासी होता. संकेत स्थळावरील उपवर तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वार्षिक उत्पन्न दहा लाख होते. त्या “उपवर” तरुणाचे कोचींग इंस्टिट्युट असल्याचे दर्शवण्यात आले होते. कामिनी जळगाव शहरातील रहिवासी होती. संकेत स्थळावरील त्या “उपवर” तरुणाचे आईवडीलांसह राहण्याचे ठिकाण देखील जळगाव होते. अलिखीत प्रथेनुसार कामिनीच्या जवळच्या नातेवाईकांनी त्या स्थळाची कानोसा घेवून माहिती घेतली. दिलेल्या पत्त्यावर त्या उपवर तरुणाचे घर आणि कोचींग इंस्टीट्युट असल्याची तसेच आर्थिक सुबत्ता असल्याची नातेवाईकांची खात्री झाली. तसेच तो तरुण कामिनीला मनोमन आवडला. त्यामुळे तिने देखील या स्थळाला होकार दिला. त्यामुळे मध्यस्त नातेवाईकांमार्फत ओळखीपाळखी काढून निमंत्रण देत पुढील पुरक बोलणी करण्यात आली.
उपवर तरुणाची आर्थिक सुबत्ता लक्षात घेवून आपली मुलगी कामिनी सुखात राहील असा विचार तिच्या पालकांनी केला. दोन्ही पक्षाकडील मंडळी विवाहाच्या बोलणी प्रसंगी जमली. यावेळी समाजाच्या चालीरीतीनुसार तोळ्याच्या रुपात सोने व रोखीच्या रुपात लाखातील रक्कम आणि संसारोपयोगी वस्तू असा हुंडा वरपक्षाला देण्याचे ठरले. हा हुंडा जवळच्या चार नातेवाईकांसमक्ष वधू पक्षाने वर पक्षाला दिला. नियोजीत तारखेला कामिनीचे लग्न लॉकडाऊन काळात निवडक नातेवाईकांच्या हजेरीत झाले.
लग्नानंतर कामिनी व तिच्या पतीने ब्राम्हणाच्या मदतीने, नातेवाईकांच्या साक्षीने श्री सत्यनारायणाची पुजाअर्चा केली. त्यानंतर दुस-या दिवशी घरातच मधुचंद्राच्या रात्रीची बेडरुममधे तयारी अर्थात सजावट करण्यात आली.
त्या रात्री कामिनी मनोमन खुष होती. ज्या रात्रीची प्रत्येक विवाहित तरुणी आतुरतेने वाट बघत असते ती रात्र आणि तो क्षण जवळ आला होता. मात्र त्या रात्री जे घडले ते कामिनीसाठी विचित्र होते.
मधुचंद्राच्या रात्री तिच्या पतीने तिच्यासमोरच प्रणयक्षमता अर्थात स्टॅमीना वाढवण्याची गोळी घेतली. नैसर्गीक प्रणयक्षमता वापरुन पतीने आपल्यासोबत समागम करावा अशी कामिनीची मनोमन इच्छा होती. मात्र आपल्या समक्ष पती प्रणयक्षमता कृत्रीम पद्धतीने वाढवण्यासाठी औषधी घेत असल्याचे बघून कामीनीला चुकीचे वाटले. तिने देखील नाईलाजाने आपली लज्जा बाजूला ठेवून त्याच्या या कृत्याला विरोध दर्शवला.
त्यावर तिच्या पतीने तिला म्हटले की या गोळीमुळे प्रणयाची धुंदी वाढते. एक्स्ट्रॉ टाईम अर्थात प्रणयाचा जादा टाईम अर्थात बोनस वेळ मिळतो. स्त्री कंटाळून जाईल मात्र पुरुषाची धुंदी कमी होणार नाही अशी या गोळीची करामत असते. असे म्हणत कामिनीच्या पतीने ती गोळी घेतली.
मात्र गोळी घेवून देखील तिच्या पतीची क्षमता अजिबात वाढली नाही. जी नैसर्गीक क्षमता होती ती देखील खालावली. त्यामुळे पुन्हा एकवेळ आपली लज्जा बाजुला ठेवून कामिनीने त्याला विचारले की तुम्ही पुरुषात नाही काय? तिच्या बोलण्याचा त्याला राग आला. तु माझ्या पौरुषत्वावर संशय घेते असे म्हणत त्याने तिला मारहाण केली व काही वेळातच झोपून गेला. ती रात्र कामिनीने तळमळत काढली. आपण काय विचार केला होता आणि काय झाले असे म्हणत ती देखील पाय दुमडून झोपी गेली.
दुस-या दिवशी तिच्या पतीने तिच्यासोबत समागम करण्यासाठी एक कृत्रीम यंत्र (एक्स्टर्नल ऑर्गन व्हायब्रेटर) आणले. या यंत्राच्या वापरामुळे कामिनीच्या विशिष्ट अंगाला प्रचंड वेदना होवू लागल्या. त्या वेदना सहन झाल्या नाही म्हणून ती मोठ्याने ओरडू लागली. बाहेर आल्यावर तिने हा प्रकार तिच्या सासूच्या कानावर घातला. त्यावर तिच्या सासून उलट तिलाच धमकावले. माझा मुलगा सांगेल तसे कर असे म्हणत तिला गप्प बसण्यास सांगितले.
त्याच रात्री तिच्या पतीने तिला बळजबरी विवस्त्र होण्यास भाग पाडले. तशाच अवस्थेत त्याने तिचे कॅमे-याच्या मदतीने वेगवेगळ्या अॅंगलने फोटो काढले. एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही. त्याने मोबाईल व टॅबमधे व्हिडीओ शुटींग देखील केली. सदर व्हिडीओ शुटींग आणि फोटो त्याने त्याच्या लॅपटॉप मधे स्टोअर करुन ठेवली.
या सर्व त्रासाला कामिनी वैतागली. काही दिवसांनी या फोटोसेशन आणि व्हिडीओ शुटींगच्या बळावर तो तिला त्रास देवू लागला. त्याने तिला म्हटले की तुझ्या आईवडीलांनी लग्नात कमी हुंडा दिला. आता तु तुझ्या आईवडीलांकडून पैसे घेवून ये. नाही तर मी तुझे नग्न फोटो आणि शुटींग व्हायरल करेन.
कामिनीच्या पतीने तिच्या बॅकेचा डाटा घेण्यासाठी तिला बळजबरी केली. तिचे बॅंक खाते त्यानेच हॅक केल्याची तिची खात्री झाली. तिच्या मोबाईल क्रमांकाला त्याने क्लोन केल्याचा देखील तिला संशय आला. तिच्या मोबाईल क्रमांकाचे इनकमींग व आऊटगोईंग कॉल त्याने हॅक केले असावे अशी तिला शंका येवू लागली.
तिच्या पतीने बळजबरी तिच्या सह्या को-या स्टॅंप पेपरवर घेतल्याचा तिने आरोप केला. पतीसह सासरच्या मंडळींवर विविध आरोपांची यादी घेवून तिने रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठले.
रामानंद नगर पोलिस स्टेशनला कामिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती, सासरे, सासु, नणंद अशा चौघांविरुद्ध विविध आरोप केले. तिच्या फिर्यादीनुसार जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 337/20 भा.द.वि. 498 अ, 323, 504, 506, 34, 377, 406, माहीती तंत्रज्ञान कायदा 2008 चे कलम 66(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. अनिल बडगुजर व त्यांचे सहकारी जितेंद्र तावडे करत आहेत. ( या कथेतील पिडीतेचे “कामिनी” हे नाव काल्पनिक आहे)