मुंबई : सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूचा तपास सुरु झाल्यानंतर बॉलीवुडचे ड्रग्ज कनेक्शन मोठ्या प्रमाणात उघडकीस आले. मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावरील महिला कलाकार देखील ड्रग्ज घेत असल्याचे उघडकीस येवू लागले आहे.
कपील शर्माच्या टीव्ही शो मधे काम करणारी कलाकार भारती सिंह नुकतीच ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आली आहे. भारती सिंह व तिचा पती हर्ष हे दोघे जण सध्या ड्रग्ज प्रकरणी अटकेत आहेत. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी त्यांना अटक केली आहे. धार्मीक मालिकेत देवीची भुमीका करणा-या प्रितिका चौहान नामक अभिनेत्रीला देखील ड्रग्ज प्रकरणी काही अटक झाली होती.
प्रणयाची धुंदी वाढवण्यासह स्लिम राहण्यासाठी अभिनेत्री ड्रग्जची नशा करत असल्याचा खुलासा उस्मान नामक ड्रग्ज सप्लायरने चौकशीदरम्यान केला आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देण्यासाठी, अधिक कालावधीसाठी टिव्ही मालिकांसह विविध शो मधे टिकाव लागण्यासाठी स्लिम राहणे गरजेचे असते. त्यासाठी ड्रग्जची नशा केली जाते.
बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराचा जेवढा मोठा दर्जा तेवढी महागडी ड्रग्ज त्याच्याकडून घेतली जातात. मोठे कलाकार कोकेनसारखी महागडी ड्रग्ज घेत असतात अशी माहिती पुढे आली आहे. त्याहून कमी उत्पन्न मिळवणारे कलाकार एमडी सारखी ड्रग्जचे सेवन करतात. ज्या कलाकारांची कमाई सर्वात कमी असते मात्र त्यांना स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड असते ते कलाकार गांजा, चरसचे सेवन करतात. असे असले तरी दिपीका पदुकोन आणि तिची बिझनेस मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या चॅटमधे वीड आणि हॅश या शब्दांचा उपयोग करण्यात आला होता. हॅश याचा अर्थ हशीश या ड्रग्जशी संबंधीत आहे.