नवी दिल्ली : या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात सोन्याची गुंतवणूक सुरक्षित ठरत आहे. जोखमीच्या कालावधीत सोन्याच्या गुंतवणुकीकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहिले जाते. सध्या सोन्याच्या किमतीत बरीच घसरण झाली आहे.
अमेरिकन डॉलर आणि कोरोना लसीच्या बातम्यांमुळे सोन्या-चांदीचे दर घसरत आहेत. ऑगस्ट महिन्यानंतर आतापावेतो सोने जवळपास सहा हजार रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाल्याचे दिसुन आले आहे.
कोरोनावरील प्रभावी लस लवकर येण्याच्या बातम्यांमुळे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांपर्यंत कमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीची घसरण सुरु राहणार असल्याचे म्हटले जात आहे. नविन वर्षापर्यंत सोन्याचे दर सध्याच्या किंमतीपेक्षा 5000 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त होण्याची शक्यता आहे.