जळगाव : चाकुच्या धाकावर जबरी चोरी करुन फरार झालेल्या आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आज शिताफीने अटक केली आहे.
सिंधी कॉलनी येथील रहिवासी अनिल ठाकुर हे त्यांच्या रिक्षाच्या सिट कव्हरची मजुरी देण्यासाठी जात होते. त्यावेळी दिनदयाल नगर परिसरात अशोक कोळी, जावेद बागवान व त्यांचा अजुन एक साथीदार अशा तिघांनी चाकूचा धाक दाखवून अनिल ठाकुर यांच्या खिशातील 4900 रुपये रोख हिसकावून घेतले होते. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 944/20 भा.द.वि. कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने सापळा रचून अशोक कोळी यास दिनदयाल नगर भागातून शिताफीने अटक करण्यात आली. तसेच त्याचा साथीदार जावेद उर्फ पोटली नवाब बागवान यास पंचशील नगर भागातून शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये ,पोलीस नाईक किशोर महाजन, रमण सुरळकर, रविंद्र बि-हाडे, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, रविंद्र तायडे, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे यांच्या पथकाने य कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये व पो. कॉ. रविंद्र तायडे करत आहेत.