सट्टा जुगारावर राजीव गांधी नगरात धाड – कुंटणखान्याचा संशयातून भजे गल्लीतून महिला ताब्यात?

जळगाव : रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर भागात सुरु असलेल्या कल्याण मिलन सट्टा जुगारावर आज धाड टाकण्यात आली. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या पथकाने या धाडीत पाच जणांना त्याब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कब्जातून 10 हजार 700 रुपये रोख, तिन मोबाईल, कॅल्क्युलेटर, सट्टा जुगाराचे साहित्य असा एकुण 20 हजार 300 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे. या पाचही जणांविरुद्ध रितसर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे

आकाश बुधा झनके समता नगर जळगाव, देवीदास पांडुरंग महाजन हरिविठ्ठल नगर जळगाव, महेश भगवतीप्रसाद बाजपेयी हरिविठ्ठल नगर जळगाव, योगेश सिताराम उपाध्ये राजीव गांधी नगर जळगाव, या आकडे घेणा-या चौघांसह उखर्डू भिला लोंढे या ग्राहकास आकडे लावतांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

रविंद्र सुकदेव मोतीराया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.उ.नि. सुनील पाटील, सहायक फौजदार विनयकुमार देसले, हवालदार राजेश चौधरी, किरण धमके, अशोक फुसे आदींनी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान शहरातील नविन बस स्थानक परिसरातील साई गजानन हॉटेल लॉजींग येथे सट्टा जुगार सुरु असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हा पेठ पोलिसांचे पथक गेले होते. त्या ठिकाणी सहायक पोलिस अधिक्षकांच्या पथकाला एक तरुण, एक तरुणी व महिला आढळून आल्या. लॉजच्या नावाखाली या ठिकाणी कुंटणखाना सुरु असल्याचा संशय आल्यामुळे त्यांना ताब्यात घेवून जिल्हा पेठ पोलिसात नेण्यात आल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here