सोलापूर/पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली. पहाटे अडीच वाजता या पूजेला सुरुवात झाली. त्यानंतर 3.30 वाजता विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा हा सोहळा झाला.
यावेळी, श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मान कवडुजी नारायण भोयर (64) व कुसुमबाई कवडूजी भोयर (55) डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा यांना मिळाला. उपमुख्यमंत्र्यांसोबत या दाम्पत्याने देखील श्री विठ्ठलाची महापूजा केली.
कोरोनाचे सावट असल्याने अतिशय निवडक व कमी संख्येतील मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा झाली.