मुंबई : येस बॅँकेतील हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने मध्यरात्री जागतिक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी कॉक्स आणि किंग्जचे प्रवर्तक पीटर केरकर उर्फ अजय अजीत पीटर यांना अटक केली असून त्यांना आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
येस बँक प्रकरणी दाखल असलेल्या मनी लॉडरिंग प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने गेल्या जून महिन्यात कॉक्स अँड किंग्ज कार्यालयात छापेमारी झाली होती. याच प्रकरणात येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक झाली आहे. याबद्दल पहिले आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले असून ही बँकेची मोठी कर्जदार कंपनी होती. या कंपनीची ३,६४२ कोटी रुपयांची थकबाक़ी आहे. सन १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुंबई आणि यूके येथे मुख्य कार्यालय मध्ये आहे. कॉक्स अँड किंग्ज लिमीटेडचे काम २२ देश आणि ४ खंडात पसरले आहे.