जळगाव : जळगाव शहरातील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 71 वा संविधान दिवस मोठ्या उत्साहात झाला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व जागरुकता निर्माण झाली.
सकाळी 11 वाजता संविधान दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याची पुर्वकल्पना शिक्षक प्रविण चिमणकर यांनी विद्यार्थ्यांना दिली होती. नियमित ऑनलाईन वर्ग आटोपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म पाठवून त्याद्वारे लिंक पाठवण्यात आली होती. यावेळी प्रथम प्रविण चिमणकर यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर संविधान दिनाचे महत्व विशद केले. शिक्षिका वंदना मार्कंड व शिक्षिका हर्षा वाणी यांनी देखील विद्यार्थी वर्गास संविधान दिनाचे महत्त्व पटवून देत माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल आदर आणि जागरुकता निर्माण झाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानातील मुल्ये, मुलभूत तत्वे ऑनलाईन समजून घेतली. संविधान दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिका अशी 86 जणांची उपस्थिती होती.
संपुर्ण कार्यक्रम कोविड – 19 च्या शासकीय नियमानुसार झाला. कार्यक्रमासाठी प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्यासह रुपाली वाघ, मनोज दहाडकर यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.