जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची भरीव कामगीरी सध्या दिसून येत आहे. आज चोपडा शहरात एलसीबी व चोपडा शहर पोलिस स्टेशन अशा दोन पथकांच्या माध्यमातून तिघांकडून दोन बनावटी गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील उमर्टी वरला येथून गावठी बनावटीचे पिस्टल खरेदी करुन काही तरुण चोपडा शहरातून जाणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले तसेच पो.नि. अवतारसिंग चव्हाण यांना समजली होती.
त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र काशिनाथ पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, पो.हे.कॉ. अश्रफ निजामोद्दीन शेख, पो.हे.कॉ. नरेंद्र वारुळे, पो. ना. दिपक शांताराम पाटील, पो.ना. मुरलीधर सखाराम बारी, पो.कॉ. दिपककुमार फुलचंद शिंदे, पो.ना. प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ.किरण धनगर, पो.कॉ. दर्शन ढाकणे यांच्यासह चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सहायाक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव, सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, पोलिस नाईक प्रदीप राजपुत, पोलिस नाईक संतोष पारधी, पोलिस नाईक ज्ञानेश्वर रविंद्र जवागे, पो.कॉ. हेमंत कोळी, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पोलिस नाइक जयदिप राजपुत, पो.कॉ. प्रमोद पवार, पो. कॉ. रविंद्र पाटील अशा दोन पथकात यांना विभागणी करुन रवाना करण्यात आले होते.
यातील एका पथकाने चोपडा शहरातून जाणा-या चुंचाळे ते चोपडा रस्त्यावर आकाश माधव सानप (२४) रा.चिंचोल ता सिन्नर जि. नाशिक व महेश निवृत्ती सानप (२४) रा वडगांव पिगंळा ता सिन्नर जि नाशिक यांना ताब्यात घेतले. दोघांच्या अगंझडती दरम्यान यांच्या कब्जातून २५००० रुपये किमतीचे गावटी बनावटीचे पिस्टल (कट्टा) व ४००० रुपये किमतीचे ४ जिवंत काडतुस असा एकुण २९००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५ ,(१), (अ), ७/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्ह दाखल करण्यात आला.
दुस-या पथकाने चोपडा ते चुंचाळे रस्त्यावर मयुर काशिनाथ वाकडे (२२) रा अरुणनगर चोपडा यास ताब्यात घेण्यात आले. अंगझडती दरम्यान त्याच्या कब्जातून २५००० रुपये किमतीचे गावटी बनावटीचे पिस्टल (कट्टा) व २०००/- रुपये किमतीचे २ जिवंत काडतुस असे हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५ (१), (अ), ७/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्ह्यातील आरोपींविरुध्द चोपडा शहर पोलिस स्टेशन, सिन्नर एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन तसेच अंबड पोलिस स्टेशन अशा विविध पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.