जळगाव : आजारी पत्नीला दवाखान्यात नेल्यानंतर संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना जळगाव शहरातील उस्मानीया पार्क परिसरात घडली. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भंगार विक्री करणारे फकीरा खान हे उस्मानीया पार्क येथे रहात असून त्यांनी कर्जाने एक लाख रुपये काढून आणले होते. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता फकीरा खान हे गर्भवती पत्नीला दवाखान्यात घेवून गेल्याची संधी साधत एक लाख रुपये रोख, दिड लाख रुपयांचे दागीने असा एवज चोरट्यांनी गायब केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी घराची पाहणी केली. पुढील तपास सुरु आहे.