रायपूर: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कोब्रा २०६ बटालियनवर झालेल्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) नऊ जवान या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
काल रात्री दहा वाजेच्या सुमारास सीआरपीएफचे जवान ताडमेटला परिसरातील बुर्कापालपासून सहा कि.मी. अंतरावर नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. आयईडी स्फोटात जखमी झालेले सर्व जवान कोब्रा २०६ या बटालियनमधील आहेत. सुकमाचे पोलीस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी या हल्ल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
या हल्ल्यातील जखमी जवानांना हेलिकॉप्टरने उपचारांसाठी रायपूरला आणले गेले आहे. असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांनी रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.