जेलमधून फरार, बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशिल मगरे जेरबंद

जळगाव : दरोड्याच्या गुन्हयात अटकेतील पोलिस कर्मचारी सुशील मगरे हा जळगाव सब जेलमधून फरार झाला होता. गेल्या 25 जुलै रोजी सकाळी सात वाजता तो त्याच्या इतर साथीदारांसह फरार होण्यात यशस्वी झाला होता.

25 जुलै रोजी जळगाव सब जेलच्या मुख्य प्रवेशद्वारावर पंडीत दामु गुंडाळे हे रक्षक म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील व सुशिल अशोक मगरे या तिघांनी एकत्र येवून रक्षक पंडीत गुंडाळे यांच्या कपाळावर गावठी कट्टा लावून त्यांना मुख्य प्रवेशद्वार उघडण्यास भाग पाडले होते.
बाहेर आल्यावर त्यांचा जगदीश पुंडलीक पाटील हा साथीदार अगोदरच मोटार सायकल घेवून तयार होता. चोघे जण एकाच दुचाकीने फरार झाले होते. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.81/20 भा.द.वि.307, 353, 120(ब), 224,225,201 सह आर्म अॅक्ट कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून बडतर्फ पोलिस कर्मचारी तथा आरोपी सुशील मगरे (32) रा.लेलेनगर पहुर कसबे, ता.जामनेर हा फरार होता. मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात राज्यात त्याचा शोध घेण्यात आला होता. दरम्यान 29 नोव्हेंबर रोजी फरार सुशील मगरे हा पहुर येथे आला असल्याची गुप्त माहिती पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. राहुल खताळ यांना समजली. त्यानुसार भल्या पहाटे पो.नि. राहुल खताळ व त्यांच्या सहका-यांनी त्याला अटक करण्यात यश मिळवले.
त्याचे ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्टल व सुरा हस्तगत करण्यात आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 323/20 आर्म अ‍ॅक्ट 3/25, 4/25 तसेच मु.पो.का. 135 नु सार वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याला जामनेर न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जेलमधून पळून गेल्या गुन्ह्याशी संबंधीत जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील, जगदीश पुंडलीक पाटील, नागेश मुकुंदा पिंगळे, अमीत उर्फ नितेश सुदर्शन चौधरी उर्फ बिहारी, सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील, चेतन उर्फ माया अनिल भालेराव, डिगंबर बाळु कोळी, करण रतिलाल पावरा यांना यापुर्वीच अटक करण्यात आली असुन सर्व आरोपी कारागृहात आहेत.

आतापर्यंत फरार असलेला व अटक करण्यात आलेला आरोपी सुशिल अशोक मगरे हा बडतर्फ पोलीस कर्मचारी असुन त्याने यापुर्वी जबरी चोरीचा गुन्हा केला आहे. त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 281/17 भा.द.वि.392, 34 आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार, कोथरुड पोलिस स्टेशनला गु.र.न. 368/19 भा.द.वि. 397 आर्म अ‍ॅक्ट 3/25 तसेच जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 303/19 भा.द.वि. 379 नुसार गुन्हे दाखल आहेत.

आरोपी सुशील मगरे यास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलीस निरीक्षक अमोल देवढे, पोलीस उप निरीक्षक संदीप चेढे, पो.हे.कॉ. भरत लिंगायत, पो.कॉ. ज्ञानेश्वर ढाकरे, पो. कॉ. अनिल राठोड, पो.कॉ. ईश्वर देशमुख (पहुर पोलीस स्टेशन) यांनी विशेष परीश्रम घेत शिताफीने अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here