बीएचआर प्रकरणी बड्या हस्तींची नावे माझ्याऐवजी पोलिसांनी द्यावी – खडसे

जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी तपास सुरु आहे. त्यामुळे या गैरव्यवहारात गुंतलेल्या बड्या हस्तींची नावे माझ्याऐवजी पोलिसांनी द्यावी असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पोलिस तपासावर परिणाम होणार हे लक्षात घेवुन मी आपणास मर्यादीत माहिती देणार असल्याचे देखील खडसे यांनी पुढे बोलतांना म्हटले

या पत्रकार परिषदेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समवेत अ‍ॅड. किर्ती पाटील या उपस्थित होत्या. यावेळी खडसे यांनी म्हटले की माझ्याकडे अनेक कागदपत्रे उपलब्ध आहेत. या गैर व्यवहार प्रकरणी पाठपुरावा करणाऱ्या अ‌ॅड. किर्ती पाटील यांना याविषयी कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली नाही. तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. मात्र त्यांना अतिशय त्रोटक माहिती देण्यात आली. बीएचआर प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात करोडो रुपये किमतीच्या मालमत्ता मातीमोल दरात खरेदी करण्यात आल्या असून यामुळे पर्यायाने ठेवीदारांचे नुकसान झाले आहे.

‘बीएचआर’ पतसंस्थेत जवळपास 1100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून याबाबत आपण सन 2015 पासून पाठपुरावा सुरु ठेवला आहे. तत्कालीन राज्य सरकारने मर्जीतील जवळच्या लोकांना सांभाळण्यासाठी हे प्रकरण दडपल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केवळ राजकीय दबावाखाली या गैरव्यवहाराच्या तपासकामी विलंब लावण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या अ‌ॅड. किर्ती पाटील यांनी देखील अधिकची माहिती यावेळी पत्रकारांना दिली. अ‍ॅड. किर्ती पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले की बीएचआर पतसंस्थेत ठेवी ठेवणा-या ठेवीदारांच्या हिताचे निर्णय अवसायक कंडारे यांनी घ्यायला हवे होते. मात्र त्यांनी खूप चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. या पतसंस्थेचे सन 2015 पासून लेखापरीक्षण झालेले नाही. ते लेखापरिक्षण का अपुर्ण राहिले याचे उत्तर अजून अनुत्तरीत आहे. अवसायकाने मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे नियोजन केले होते. मात्र या गैरव्यवहारातून अवसायक सुटू शकत नाही असे देखील अ‍ॅड. किर्ती पाटील यांनी बोलतांना म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here