जळगाव : भुसावळ शहरातून चारचाकी वाहन चोरणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.
नितीन रामलाल राजपूत (37) रा. लोहारा ता.पाचोरा जिल्हा जळगाव असे ताब्यातील तरुणाचे नाव आहे. विना क्रमांकाची सुझुकी कंपनीची इको फोर व्हिलर सह त्याला संशयास्पदरित्या एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन चोरीचे असल्याचे आढळून आले. ताब्यातील वाहन त्याने उधना (गुजरात) येथून चोरी केल्याचे त्याने कबुल केले.
पोलिस पथकाने उधना पोलिसांशी संपर्क साधला असता गु.र.न. 2321/20 भा.द.वि. 379 नुसार नितीन राजपुत याच्याविरुध्द गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याला चारचाकी वाहनासह् उधना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या गुन्ह्याच्या कारवाईत पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ. शरिफोद्दीन काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, यांनी सहभाग घेतला.