लग्नाच्या चार दिवसापुर्वी उपवधू तरुणीने संपवली जिवनयात्रा

On: June 29, 2020 7:07 PM

औरंगाबाद: अवघ्या चार दिवसांवर लग्नाची तारीख जवळ आली असतांना उपवधू तरुणीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना गुरुवारी सकाळी मित्रनगर येथे घडली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

स्रेहल दिलीप चौधरी (२५) असे मयत तरुणीचे नाव आहे. सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे स्रेहलचा लग्न समारंभ लांबणीवर टाकण्यात आला होता. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थित लग्न करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाकडील मंडळींनी घेतला होता.

जळगाव जिल्ह्यातील गावी हे लग्न होणार होते. त्यामुळे स्नेहलसह तिचे  आई-वडील, लहान बहीण असे सर्व जण गावी जाणार होते. गुरुवारी सकाळी सात वाजता  तिचे वडील कामावर गेले होते. त्यानंतर आठ  वाजेच्या सुमारास स्रेहल झोपेतून उठली व स्वयंपाकघरात गेली. त्यानंतर तिने आतून दरवाजा लावून घेतला. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. त्यामुळे सर्वांना शंका आली. दरवाजा तोडून आत गेल्यावर तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment